
अविनाश ढगे
पिंपरी : स्वच्छतेचा अभाव, अपुरी बैठकव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची वानवा, मद्यपी, भिकाऱ्यांचा वावर, सुरक्षा व्यवस्थेचे ‘तीन-तेरा’... ही स्थिती आहे पुणे ते लोणावळादरम्यानच्या रेल्वे स्थानकांची. ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आले. पुणे ते लोणावळादरम्यानच्या १७ रेल्वे स्थानकांचा समावेश असून, येथे दररोज लोकलच्या ४२ फेऱ्या होतात. या सर्व असुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होते.