मावळात आज 26 नवे पॉझिटिव्ह, तर तळेगावात एकूण रुग्णांचा आकडा सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

मावळ तालुक्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली.

वडगाव मावळ (ता. मावळ) : मावळ तालुक्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. दिवसभरात २६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कशाळ येथील कोरोनाबाधित ५६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या दोन हजार १७७ झाली असून, आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू  झाला आहे. एक हजार ५६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २६ जणांमध्ये कामशेत येथील सर्वाधिक सात, तळेगाव दाभाडे येथील सहा, वडगाव येथील पाच, शिरगाव व काले येथील प्रत्येकी दोन; तर वराळे, डोंगरगाव, देवले व नाणोली येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. दरम्यान, रुग्णसंख्येने तळेगाव येथे साडेसातशेचा; तर वडगाव येथे दीडशेचा टप्पा गाठला. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार १७७ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार १६८, तर ग्रामीण भागातील एक हजार नऊ जणांचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ५६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी पाच जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात सध्या ५२८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३५४ जण लक्षणे असलेले व १७४ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३५४ जणांपैकी २५३ जणांमध्ये सौम्य, तर ८४ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १७ जण गंभीर आहेत. सध्या ५२८ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 26 corona positive found in maval