मावळात दिवसभरात २९ नवे पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली एक हजार ८५४    

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात २९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ८५४ झाली आहे, तर आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात २९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ८५४ झाली आहे, तर आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ३६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २९  जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १७, सोमाटणे व चिखलसे येथील प्रत्येकी दोन तर लोणावळा, कुसगाव बुद्रुक, धामणे, गहुंजे, शिलाटणे, नायगाव, मळवली व वरसोली येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ८५४ झाली असून, त्यात शहरी भागातील ९६९ व ग्रामीण भागातील ८८५ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ६२९, लोणावळा येथे २१६, तर वडगाव येथील रुग्ण संख्या १२४ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक हजार ३६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात सध्या ४१३ सक्रिय रुग्ण आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यातील २८२ जण लक्षणे असलेले, तर १३१ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २८२ जणांपैकी १९० जणांमध्ये सौम्य व ७६ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १६ जण गंभीर आहेत. सध्या ४१३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 29 corona positive found in maval