Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 322 पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 322 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 84 हजार 886 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 322 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 84 हजार 886 झाली आहे. आज 534 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 80 हजार 280 झाली आहे. सध्या तीन हजार 149 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन आणि शहराबाहेरील 11 अशा 13 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 457 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 591 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष वाकड (वय 78) व महिला पिंपळे गुरव (वय 34) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष चाकण (वय 43), हिंजवडी (वय 49), नगर (वय 64), शिक्रापूर (वय 73), पुणे (वय 63) नांदेड (वय 75), सांगली (वय 57), खेड शिवापूर (वय 60) आणि महिला तळेगाव (वय 49), जुन्नर (वय 55), चाकण (वय 70) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्ग एक हजार 314 पथकांद्वारे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू झाले आहे. आज एक लाख नऊ हजार 170 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यातील 79 संशयितांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 322 corona positive in pimpri chinchwad on thursday 15 october 2020