मावळात आज ८१ नवे पॉझिटिव्ह; सर्वाधिक रुग्ण लोणावळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

मावळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ८१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ८१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. लोणावळा येथील ७० वर्षीय व कार्ला येथील ४२ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या चार हजार ६४१ व मृतांची संख्या १६१ झाली आहे. तीन हजार ८२० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, ५३ जणांना घरी सोडण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ८१ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ३०, तळेगाव दाभाडे येथील २१, कामशेत येथील १०, कुणे नामा येथील पाच, सांगवडे येथील चार, कुसगाव बुद्रुक येथील तीन, इंदोरी व शिवणे येथील प्रत्येकी दोन; तर माळवाडी, सुदवडी, जांबवडे, तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या चार हजार ६४१ झाली असून, त्यात शहरी भागातील दोन हजार ७०० आणि ग्रामीण भागातील एक हजार ९४१ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक एक हजार ४००, लोणावळा येथे एक हजार २० आणि वडगाव येथे रुग्णसंख्या २८० एवढी आहे. आतापर्यंत १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन हजार ८२० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी ५३ जणांना घरी सोडण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या तालुक्यात ६६० सक्रिय रुग्ण असून, त्यातील ४२६ लक्षणे असलेले व २३४ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ४२६  जणांमध्ये ३३३ जणांमध्ये सौम्य तसेच, ८७ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सहा जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ६६० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 81 corona positives found in maval