पिंपरी-चिंचवड शहरात आज 814 जणांना संसर्ग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरातील 905 रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज मिळाला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 905 रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 61 हजार 995 झाली आहे. आज 814 जण पॉझिटिव्ह आढळले. आजपर्यंत एकूण 71 हजार 641 जणांना संसर्ग झाला आहे. आज 34 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील 22 व शहराबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे. सध्या आठ हजार 471 सक्रिय रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‌आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण चिंचवड (पुरुष वय 76, 75 व 34), भोसरी (पुरुष वय 71, 36, 68, 88), पिंपरी (पुरुष वय 84, 59 व स्त्री 58), तळवडे (पुरुष वय 50), सांगवी (पुरुष वय 35 व 63), ताथवडे (स्त्री वय 65), पिंपळे निलख (पुरुष वय 75),  वाकड (स्त्री वय 46), आकुर्डी (पुरुष वय 58),  मोशी (स्त्री वय 40), निगडी (पुरुष 70),  प्राधिकरण (पुरुष 63), चिखली (पुरुष 59) व  रुपीनगर ( पुरुष वय 49) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज मृत्यू झालेल्या शहराबाहेरील व्यक्ती चाकण (पुरुष वय 29 व स्त्री वय 47), धनकवडी पुणे (पुरुष वय 58), वारजे (स्त्री वय 53), मंचर (पुरुष वय 73), लोणावळा ( पुरुष 79), वडगाव (पूरुष वय 75), मारुंजी (पुरुष वय 38), इंदोरी (पुरुष वय 89), जुन्नर (पुरुष वय 64), आंबेगाव (पुरुष वय 70), सातारा (स्त्री वय 75), येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 814 corona positive found in pimpri chinchwad