Video : हे नवीन मास्क पाहिलेत का? नागरिकांकडून या मास्कला सर्वाधिक पसंती मिळतेय

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी कॉटनच्या मास्कचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

पिंपरी : कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी कॉटनच्या मास्कचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून या मास्कची शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्री सुरु झाली आहे. या मास्कची किंमत कमी असल्यामुळे नागरिक त्याची खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर सर्जिकल मास्कचा वापर करण्याचे प्रमाण वाढले होते. आता मात्र, मास्कच्या वापर करण्याच्या ट्रेन्डमध्ये बदल होताना दिसत आहे. कॉटनच्या कापडाचा वापर करुन अनेक प्रकारचे मास्क तयार करण्याचे उद्योग शहरात अनेक ठिकाणी सुरु झाले आहेत. लॉकडाउनमुळे अनेक उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांनी याचे मार्केटिंग करत रस्त्यावर त्याची विक्री सुरु केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टिकाऊ आणि आकर्षक अशा प्रकारच्या या मास्कची नागरिकदेखील खरेदी करत आहेत. शहरातील पिंपरी चौक, चिंचवड, आकुर्डी, वाकड, भोसरी या परिसरात रस्त्याच्या लगतच्या बाजूला स्टॅन्ड लावून किंवा झाडाला दोरी बांधून या मास्कची विक्री सुरु आहे. कॉटनच्या कापडापासून हे मास्क तयार करण्यात आले असल्यामुळे पाण्याचे स्वच्छ करुन त्याचा पुन्हा वापर करता येउ शकतो, त्यामुळे याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. 

100 रुपयांना चार मास्क.... 

कॉटनच्या मास्कची मागणी बाजारपेठेत वाढत असून, 100 रुपयांना चार या दराने त्याची विक्री होत आहे. औषध दुकानदारांकडे दहा रुपयांपासून मास्क उपलब्ध आहेत. मात्र, त्यापेक्षा कापडापासून तयार केलेले हे मास्क टिकाउ असल्यामुळे नागरिक त्याची खरेदी करण्यास सर्वाधिक पसंती देताना दिसत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new cotton mask available in market at pimpri chinchwad