esakal | विद्यार्थ्यांसाठी नवीन पोषण आहार नाविन्यपूर्ण उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Nutritious Slices

विद्यार्थ्यांसाठी नवीन पोषण आहार नाविन्यपूर्ण उपक्रम

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मुलांच्या आहारात पोषण तत्त्वे असणे आवश्यक आहे. त्यासाठी आता शालेय पोषण आहाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रम योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘न्यूट्रिटिव्ह स्लाईस’ हेल्दी आहार देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीनचे मूख्य घटक असलेला हेल्दी आहार आठवड्यातून पाच दिवस मिळणार आहे.

शालेय पोषण आहारातर्गंत तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पीठीसाखर, खाद्यतेल, स्किम्ड दूध आणि इतर पोषक घटक वापरून ही न्युट्रीटीव्ह स्लाईस बनविण्यात आली असून आकर्षक पद्धतीने सीलबंद पाकिटातून या शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे. शाळांनी पुरवठादाराकडे मागणी केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत स्लाईसचा पुरवठा होणे बंधनकारक असणार आहे. यामुळे जे मुले घरात मॅगी फूड तयार करुन देण्याचा आग्रह धरतात, त्यांना शाळेतूनच हा आहार दिला जाणार आहे. पात्र असलेल्या शासकीय जिल्हा परिषद, मनपा, नपा, शासकीय व कटक मंडळ शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या या योजनेसाठी मागविण्यात आली आहे. याबाबतची ई-निविदा प्रक्रिया राबवून न्युट्रीटीव्ह स्लाईस बनविण्याचे कंत्राट जालना येथील दिव्या एस.आर.जे.फूड्स एलएलपी या संस्थेला देण्यात आले आहे.

असा आहे आहार

पात्र शाळांच्या पटसंख्येनुसार इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीकरता वेगवेगळी मागणी नोंदविण्यात यावी. पाचही प्रकारच्या न्यूट्रिटिव्ह स्लाईसच्या प्रत्येक पॅकेटच्या वजन १२० ग्रॅम असणार आहे. प्रत्येक १२० ग्रॅमच्या पॅकेटमध्ये ७.५ ग्रॅम वजनाच्या एकूण १६ न्यूट्रिटिव्ह स्लाईस असणार आहेत.

धान्यादी वस्तू - इयत्ता १ली ते ५वी - ६वी ते ८वी (प्रती विद्यार्थी मागणी व वितरणाचे प्रमाण (किलोग्रॅममध्ये)

  • न्यूट्रिटिव्ह स्लाईस (तांदूळ) - ०.१२० - ०.१२०

  • न्यूट्रिटिव्ह स्लाईस (बाजरी) -०.१२० - ०.२४०

  • न्यूट्रिटिव्ह स्लाईस (ज्वारी) - ०.२४० - ०.२४०

  • न्यूट्रिटिव्ह स्लाईस (नाचणी) -०.१२०० - ०.२४०

  • न्यूट्रिटिव्ह स्लाईस (सोयाबीन) -०.१२०० - ०.२४०

loading image
go to top