esakal | थेट खरेदीवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत खडाजंगी
sakal

बोलून बातमी शोधा

थेट खरेदीवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत खडाजंगी
  • वैद्यकीय उपकरणांचा विषय तहकूब
  • शालेय साहित्य खरेदीचा विषय मागे

थेट खरेदीवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत खडाजंगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिका शिक्षण विभागाकडून शालेय साहित्य खरेदीचा प्रस्ताव व भांडार विभागाने वैद्यकीय उपकरणांची थेट पद्धतीने केलेल्या खरेदीस स्थायी समितीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. या दोन्ही विषयांवर वादळी चर्चा होऊन प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, सभागृहात प्रशासनातर्फे केवळ आयुक्तच उपस्थित होते. अन्य अधिकारी ऑनलाइन होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर शिलवंत यांनी वैद्यकीय उपकरणांची चढ्या भावाने खरेदी केल्याचा आरोप केला. त्यामुळे हा विषय तहकूब करण्यात आला. नगरसेवक मयूर कलाटे यांनी शालेय साहित्य खरेदीच्या प्रस्तावांवर आक्षेप घेतल्याने याबाबतचे दोन्ही प्रस्ताव माघारी घेण्यात आले. 

सदस्यांनी घेतलेले आक्षेप 

ऑक्‍सिजन थेरपी यंत्राचे 130 नग थेट पद्धतीने खरेदी केले आहेत. त्यांना कार्योत्तर मान्यतेचा प्रस्ताव होता. या उपकरणाची किंमत 90 हजार ते एक लाख 15 हजारांच्या आसपास असताना तब्बल दोन लाख 59 हजारांना एक उपकरण खरेदी करीत आहे. तसेच, बारा टक्के जीएसटी महापालिका भरणार आहे. यामुळे तब्बल तीन कोटी 64 लाखांची उधळपट्टी होत आहे. शाळा बंद असतानाही शालेय साहित्य खरेदीसाठी कोट्यावधी रुपयांचे प्रस्ताव आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्थायीत मंजूर कामे व निधी 

- शहरातील विविध विकासकामांसाठी : 31 कोटी 95 लाख 
- रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राची क्षमता वाढविणे : 12 कोटी 44 लाख 
- कोविड केअर सेंटर साफसफाईसाठी : 49 लाख 86 हजार 
- स्काय वॉकर, ओपन जीम साहित्य खरेदी : 95 लाख 63 हजार 
 

loading image