esakal | ‘निगडी-लोणावळा बससेवा लवकरच सुरू होणार’
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML

‘निगडी-लोणावळा बससेवा लवकरच सुरू होणार’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) (PMPL) वतीने निगडी (Nigdi) ते लोणावळा (Lonavala) बससेवा (Bus Service) लवकरच सुरू करणार आहे, अशी माहिती मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

संघटनेचे अध्यक्ष पोपटराव भेगडे, सुरेश भोईर, पांडुरंग भेगडे, विजय पंडित, सुभाष वाळूंज, दीपाली गोकर्ण आदी पदाधिकाऱ्यांनी पीएमपीएलच्या व्यवस्थापकांना निगडी ते लोणावळा बस सेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते.

हेही वाचा: पिंपरी शहरात उद्या कोव्हिशिल्डचे २१,५०० आणि कोव्हॅक्सिनचे ३,६०० डोस

दिलेल्या निवेदनात म्हटले की, पुणे-लोणावळा रेल्वेसेवा गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे चाकरमानी, छोटे-मोठे व्यावसायिक व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना ये-जा करण्यासाठी बससेवेशिवाय दुसरा पर्याय नाही. सध्या निगडी ते वडगाव, निगडी ते कामशेत, तळेगाव-चाकण अशी बससेवा सुरू असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, कामशेत ते लोणावळा या भागात बससेवा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी लोणावळ्यापर्यंत बससेवा सुरू करावी, जेणेकरून त्यांची गैरसोय दूर होईल.

संघाने या बससेवेसाठी पाठपुरावा केल्याने पीएमपीएलने त्याची दखल घेऊन या मार्गाचे सर्वेक्षण केले. लोणावळ्यात बस उभी करण्यासाठी जागेचा प्रश्न होता. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्याशी संपर्क केला. त्यांनी बससाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आता लवकरच ही बससेवा सुरू होईल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष भेगडे यांनी दिली.

loading image
go to top