
निगडी : पीएमपी बस स्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गर्दीच्या ठिकाणी रस्त्यात खड्डे पडून पाणी साचल्याने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. परिणामी, कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत.