पुणे : कामशेतमध्ये आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

शहरात नऊ महिन्याच्या बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

कामशेत : मावळातील मोठी बाजारपेठ असलेल्या कामशेत शहरात नऊ महिन्याच्या बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेल्वे गेटजवळ संतोषी माता मंदिराच्या मागे चाळीत राहणाऱ्या या कुटुंबातील नऊ महिन्याच्या मुलाला आजारी असल्याने दवाखान्यात नेण्यात आले होते. यावेळी त्याला कावीळ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर त्याची कोरोना तपासणी केली असता, त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या नऊ महिन्याच्या चिमुकल्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कात असलेल्या आईलादेखील कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या मुलाच्या संपर्कातील चौदा जण हायरिस्कमध्ये असून, अकरा जण स्लोरिस्कमध्ये असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.  प्राथमिक आरोग्य केंद्रातील  अधिकाऱ्यांकडून या कोरोनाबाधित लहान मुलाच्या कुटुंबाच्या संपर्कातील सर्वांची  माहिती घेऊन  शोध  सुरू आहे.  तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी  घटनास्थळाची  पाहणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine months childs found corona positve in kamshet pune