esakal | लोणावळा : अश्‍लील डान्स करून गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळा : अश्‍लील डान्स करून गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांना अटक
  • मळवली येथील एका खासगी बंगल्यात अश्‍लील हावभाव करत गोंधळ घालत होते.

लोणावळा : अश्‍लील डान्स करून गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा (पुणे) : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मळवली येथील एका खासगी बंगल्यात अश्‍लील हावभाव करत गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राजेश पारसमल जैन (रा. लेमिंगटन रोड, मुंबई), महेश छगनलाल पोरवाल, विनोदकुमार मोहनलाल भन्साळी, सचिन रमेश जैन व राकेश मदनलाल पोरवाल (सर्व रा. बिजापूर, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी रोख रकमेसह एकूण एक लाख 40 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी (ता. 9) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मळवलीतील एका खासगी बंगल्यात पुरुष व महिला स्पीकरवर गाणी लावून त्यावर अश्‍लील पद्धतीने नाचत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे, विजय रहातेकर, शरद जाधवर, रूपाली कोहिनकर यांच्या पथकाने धाड टाकली. त्यात चार तरुणी अश्‍लील हावभाव करत नृत्य करत होत्या. तसेच, पुरुष त्या महिलांवर पैसे उधळताना पोलिसांना मिळून आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोख 50 हजार 880 रुपये, स्पीकर सिस्टिम, मोबाईल, असा एक लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार सीताराम बोकड हे करत आहेत. लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी बंगले बेकायदेशीरपणे भाड्याने दिले जात आहेत. यामध्ये अनैतिक प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी व सहायक पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दिला आहे.