
पिंपरी : पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘निर्जली’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला. तमिळ भाषेतील ‘थुनाई’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्राप्त केला. सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्ममध्ये ‘लेस’ ने बाजी मारली. भारतासह ४० देशांमधून ९० पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि ६० सेकंद फिल्म्स महोत्सवात प्रदर्शित झाल्या. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रियंका भेरिया आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तुषार शिंगाडे यांना प्रदान केला.