
राज्यातील परभणी, बीड, मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यू विषाणुचा प्रादुर्भाव आढळला आहे. त्यामुळे कोंबड्या, बदके, कावळे असे पक्षी मृत्युमुखी पडले आहेत.
पिंपरी - शहराच्या काही भागांमध्ये कावळे, कबुतर व वटवाघुळ असे काही पक्षी मृतावस्थेत आढळल्याच्या तक्रारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आलेल्या आहेत. मात्र, बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळलेला नाही, असे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी स्पष्ट केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यातील परभणी, बीड, मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यू विषाणुचा प्रादुर्भाव आढळला आहे. त्यामुळे कोंबड्या, बदके, कावळे असे पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, शहरात अद्यापपर्यंत प्रादुर्भाव आढळला नसल्याचे डॉ. रॉय यांनी सांगितले. ते म्हणाले, ""खबरदारीचा उपाय म्हणून पशुवैद्यकीय विभागामार्फत शहरातील पोल्ट्री व्यावसायिक व घरगुती कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित केली जात आहे. अशा ठिकाणी बर्ड फ्ल्यू आजाराच्या दृष्टीने सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास वैद्यकीय विभागामार्फत सर्वेक्षण केले जाईल. बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाणार आहे.''