esakal | Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात आज एकही मृत्यू नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात आज एकही मृत्यू नाही 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 123 रुग्ण आढळले.

Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात आज एकही मृत्यू नाही 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 123 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 88 हजार 802 झाली आहे. आज 101 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 85 हजार 475 झाली आहे. सध्या एक हजार 881 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील व शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही शहरासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. 

धक्कादायक : रावेत बंधाऱ्यात पुन्हा आढळले मृत मासे 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 546 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 639 झाली आहे. शहरात सध्या बाहेरील 167 रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहराबाहेरील एकही रुग्ण दाखल झाला नाही. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 830 रुग्ण उपचार घेत आहेत. 951 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 505 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 413 रुग्ण सध्या शहराबाहेरील रूग्णालयात दाखल आहेत.