esakal | कुठंय संचारबंदी? नागरिक रात्री बिनधास्तपणे विनामास्क रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Curfew

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारी रात्री अकरापासून संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, नागरिकांना संचारबंदीचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. संचारबंदीच्या कालावधीतही नागरिक बिनधास्तपणे विनामास्क रस्त्यावर फिरताना आढळले.

कुठंय संचारबंदी? नागरिक रात्री बिनधास्तपणे विनामास्क रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारी रात्री अकरापासून संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, नागरिकांना संचारबंदीचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. संचारबंदीच्या कालावधीतही नागरिक बिनधास्तपणे विनामास्क रस्त्यावर फिरताना आढळले. शहराच्या बहुतांश भागात पोलिसांची नाकाबंदीही दिसून आली नाही. यावरून कोरोनाबाबत नागरिक अद्यापही बेफिकीर असल्याचे स्पष्ट होते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यासह शहरांमध्ये संचारबंदीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संचारबंदी लागू झाल्यानंतरही सोमवारी रात्री नागरिक रस्त्यावर विनामास्क फिरताना दिसून आले. काही जण जेवणानंतर शतपावलीसाठी फिरत होते. तर काही लहान मुलेही विनामास्क सायकल खेळताना दिसून आली. तर रात्री सव्वा बारा वाजता पोलिस आयुक्तालयाजवळ एक जोडपे हातात हात घालून फिरताना आढळले.

नाशिकफाटा उड्डाणपुलाजवळ रात्री साडे अकरा वाजता काहीजण रस्त्यावर गप्पा मारत होते. दरम्यान, रस्त्यावर तसेच अनेक मुख्य चौकात पोलिसांचा बंदोबस्त अथवा नाकाबंदी दिसून आली नाही. यामुळे संचारबंदीची केवळ घोषणाच झाली असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लाठीचा प्रसाद
सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र नाकाबंदी करण्यात आली होती. अनेक नागरिकांना पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देण्यात आला.

Edited By - Prashant Patil