esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवडसाठी दिलासादायक बातमी; शहरात आज एकही मृत्यू नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवडसाठी दिलासादायक बातमी; शहरात आज एकही मृत्यू नाही
  • पिंपरी-चिंचवड शहरात आज 215 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 90 हजार 696 झाली आहे.

Corona Updates : पिंपरी-चिंचवडसाठी दिलासादायक बातमी; शहरात आज एकही मृत्यू नाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 215 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 90 हजार 696 झाली आहे. आज 104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 275 झाली आहे. सध्या एक हजार 835 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील व शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. आजचा रविवार शुन्य मृत्यू दिवस ठरला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 586 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 656 आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत 758 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 77 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 121 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 984 रुग्ण बरे झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 444 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 827 जणांची तपासणी करण्यात आली. आज 304 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 66 हजार 973 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.