
हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक करवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जानेवारीमध्ये तब्बल १७ हजार ८०६ चालकांवर दंडात्मक कारवाई करून ८९ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.
पिंपरी - हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक करवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जानेवारीमध्ये तब्बल १७ हजार ८०६ चालकांवर दंडात्मक कारवाई करून ८९ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. बहुतांश अपघातांमध्ये दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान न केल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात नव्हती. मात्र, आता वाहतूक शाखेने कारवाई सुरू केल्याने चालकांना हेल्मेट परिधान करूनच घराबाहेर पडावे लागणार आहे.
पिंपरी : दुकानदाराला जिवे मारण्याची धमकी देत टोळक्याने कोयते भिरकावत माजविली दहशत
आयुक्तालयाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. यापुढे देखील कारवाई सुरू राहील, असे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले.
Corona Update - पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा कोरोनाची धास्ती; 24 तासांत शंभरहून अधिक रुग्णांची भर
नियमाप्रमाणे वाहन चालविताना हेल्मेट परिधान करणे आवश्यकच आहे. या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. हेल्मेटची सक्ती किंवा पोलिस दंड करतात म्हणून नव्हे, तर नागरिकांनी स्वत:च्या जिवासाठी हेल्मेट परिधान करायला हवे.
- श्रीकांत डिसले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा
Edited By - Prashant Patil