पिंपरी महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना; कोरोनामुळे ओढवला प्रसंग

टीम ई-सकाळ
Thursday, 18 June 2020

शहरातील विकास कामे, अधिकाऱ्यांच्या बढत्या, नियुक्‍त्या, खरेदीसाठीचा खर्च, शहराचे प्रश्‍न यावर निर्णय घेणारे ठिकाण म्हणजे महापालिका सर्वसाधारण सभा.

पिंपरी : शहरातील विकास कामे, अधिकाऱ्यांच्या बढत्या, नियुक्‍त्या, खरेदीसाठीचा खर्च, शहराचे प्रश्‍न यावर निर्णय घेणारे ठिकाण म्हणजे महापालिका सर्वसाधारण सभा. दर महिन्याच्या 20 तारखेला आयोजित केली जाते. परंतु, कोरोनामुळे मंजुरीसाठी विषयच नसल्याने आणि गेल्या तीन महिन्यातील तहकूबसह विशेष सभा एक जून रोजी घेतल्याने 20 जूनची नियोजित सभा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी, अशी चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

एक जून रोजी झालेल्या सभेत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले होते. एक बाकावर चारऐवजी दोनच नगरसेवकांना बसण्याची व्यवस्था होती. अधिकाऱ्यांची व्यवस्था सभागृहाबाहेर केली होती. शिवाय, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नगरसेवकांनी सहभागी होऊ शकतील, अशीही व्यवस्था होती. साडेनऊ तास ही सभा चालली होती. मास्क, सॅनिटायझर व साबण खरेदीबाबत सभागृहात आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, नियमितपणे 20 तारखेच्या संकेतानुसार व्हायला हवी, असलेली सर्वसाधारण विषयांअभावी होणार नाही. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महापालिका सभागृहात निवडूण आलेले 128 आणि स्वीकृत पाच असे 133 नगरसेवक आहेत. भाजपचे 77, राष्ट्रवादीचे 36, शिवसेनेचे नऊ, मनसेचे एक आणि अपक्ष पाच असे 128 नगरसेवकांमध्ये बक्षीय बलाबल आहे. सत्ताधारी भाजप आहे. महापालिकेत त्यांची सत्ता येऊन साडेतीन वर्ष झाली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शनिवारच्या सभेबाबत नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, "विषय नसल्याने जून महिन्याची सर्वसाधारण सभा घेतली जाणार नाही. महिन्यातून एक सभा होणे आवश्‍यक आहे. गेल्या तीन तहकूब व एक विशेष सभा एक जूनला झाली आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे काही अडचण नाही. कोरोनामुळे राज्य सरकारने सर्वसाधारण सभा घेण्याबाबतचे अधिकार महापालिकेला दिले आहेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no meeting of pcmc in june due to no subject