Rose Day : कॉलेज कट्ट्यांबरोबर फूल बाजारही कोमेजला! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

'व्हॅलेंटाइन वीक'ला सात फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी 'रोझ डे'ला प्रेमी एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करतात.

पिंपरी : 'व्हॅलेंटाइन वीक'ला सात फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी 'रोझ डे'ला प्रेमी एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करतात. पण कोरोनामुळे महाविद्यालय बंद असल्याने कॉलेज कट्ट्याबरोबर फूल बाजारही कोमेजला आहे. कॉलेजमध्ये गर्दी नसल्याने फुलव्रिकेतेही उदासीन पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे गेल्या वर्षापासून कॉलेज बंद आहेत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत आदेश मिळाला नसल्याने कॉलेजकट्टे सुने-सुने आहेत. दरवर्षीप्रमाणे व्हॅलेंटाइन वीकमध्ये तरुणाई गर्दी पाहायला मिळत नाही. परिणामी दरवर्षी फूल बाजारात गुलाबांना असलेली मागणी पाहायला मिळालेली नाही. कॉलेज सुरू नसल्याने फूल उत्पादकांनी गुलाबाचे पुरेसे उत्पादन केले नसल्याने फूलबाजारात पुरवठा कमी आहे. डच गुलाब बंच 200, 250 ते 300 रुपये तर साधा गुलाब जुडी 50, 60 ते 80 रुपयांना विक्री होत आहे. सिंगल गुलाब 15 रुपयांना मिळत असल्याची माहिती पिंपरी फूल बाजाराचे अध्यक्ष राजकुमार मोरे यांनी सांगितले. 
 
व्हॅलेंटाइन बुकिंग 
फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर प्रेमी युगुल "व्हॅलेंटाइन डे'सह "व्हॅलेंटाइन वीक'ची सुद्धा आतुरतेने वाट पाहतात. सात ते 14 फेब्रुवारीपर्यंत "व्हॅलेंटाइन वीक' साजरा केला जातो. "व्हॅलेंटाइन वीक'चा पहिला मान हा प्रेमाचा सुगंध पसरविणाऱ्या गुलाबालाच असतो. गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. प्रेमाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तरुणाई जिवलगांवर लाल- गुलाबी- पिवळ्या गुलाबांची उधळण करतात. त्यामुळेच "व्हॅलेंटाइन वीक'ची या दिवसापासून सुरुवात होते, असे म्हटले जाते. या दिवशी प्रेमी जोडपी एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करतात. केवळ जोडपी नव्हे तर हल्ली मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य देखील केवळ आनंद, मौज म्हणून "व्हॅलेंटाइन वीक' साजरा करतात. त्यामुळे "व्हॅलेंटाइन'साठी 25 जानेवारीपासून बुकींगला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे बुकींगला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फुलविक्रेते गणेश आहेर यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा असेल व्हॅलेंटाइन वीक 

  • 7 फेब्रुवारी - रोज डे 
  • 8 फेब्रुवारी - 8 प्रपोज डे 
  • 9 फेब्रुवारी - चॉकलेट डे 
  • 10फेब्रुवारी - टेडी डे 
  • 11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे 
  • 12फेब्रुवारी - किस डे 
  • 13फेब्रुवारी - हग डे 
  • 14 फेब्रुवारी - व्हॅलेन्टाईन डे 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no response to flower sale due to college closed