esakal | आळंदी बंधाऱ्याच्या दुरूस्तीला मुहूर्त मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

alandi dam

आळंदी बंधाऱ्याच्या दुरूस्तीला मुहूर्त मिळेना

sakal_logo
By
विलास काटे

आळंदी( pimpari chinchwad news)- चिंबळी मोशीला लागून इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा (Alandi dam) ठेकेदाराने दोन महिन्यांपासून फोडून ठेवला. पण, कोरोनामुळे कामगारांची तुकडी बाधित झाली आणि कामगारांचा तुटवडा भासल्याने अद्याप बंधा-याच्या कामास सुरूवात झाली नाही. परिणामी दोन महिन्यांपासून रेंगाळलेल्या कामास दुरूस्तीसाठीचा मुहूर्त कोणता अशी विचारणा येथील नागरिक करीत आहेत. (no time to repair Alandi dam pimpari chinchwad news)

अवघ्या महिन्याभरावर पावसाळा येवून ठेपला. मोशी पाटबंधारा विभाग अंतर्गत हा बंधारा येत आहे. चिंबळी मोशीतील नागरिकांसाठी शॉर्टकटचा मार्ग आहे. तसेच गावापासून दूरवर असल्याने अनेकजण फिरण्यासाठीही याठिकाणी येतात. बंधा-यात पाणी साठवणूक केली जाते. शेतीसाठीही याचा वापर परिसरातील शेतक-यांना होत आहे. मात्र अनेक दिवसांपासून बंधा-याच्या तळबाजूकडील दुरूस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदारास कामाचे आदेशही दिले. ठेकेदाराने दोन महिन्यांपासून बंधारा फोडून ठेवला. मात्र अद्याप पुढील कार्यवाही केली नाही. परिणाम काम रेंगाळले. आता पावसाळा आला. नदीला पूर आल्यावर पुन्हा काम थांबणार. बंधा-याची साठवण क्षमता कमी झाल्याने परिसरातील विहिरींची पातळीही कमी झाली. जुनपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कोविशिल्डचे पाच हजार डोस

मोशी पाटबंधारे शाखेकडून सांगण्यात आले की, एकाच ठेकेदाराला दोन कामे दिली गेली आहेत. यामधे चिंबळी आणि वडगाव शिंदे अशा ठिकाणी कामे सुरू आहेत. वडगाव शिंदेमध्ये कामगार असल्याने आणि लॉकडाऊनमुळे कामगारांची कमी आहे. तर काही कामगार कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामुळे लॉकडाऊननंतर नविन कामगार शोधून कामे पूर्णत्वास नेली जातील. यामुळे प्रत्यक्षात काम सुरू कधी होणार याचीच प्रतिक्षा स्थानिकांना आहे.