पिंपरीकरांनो, यंदा ध्वनिपातळी घटली कारण...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

कोरोनामुळे मिरवणुकांवर बंदी असल्याने सर्वच ठिकाणी शांतता होती. गेल्या वर्षी तब्बल 112 डेसिबलपर्यंत नोंदला गेलेला आवाज या वर्षी ऐकायलाही मिळाला नाही. 

पिंपरी : ढोल-ताशा व डीजेच्या आवाजांनी दरवर्षी चिंचवडमधील चापेकर चौक व पिंपरीतील कराची चौकांसह शहरातील अन्य घाट व गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग दणाणून जात. या वर्षी कोरोनामुळे मिरवणुकांवर बंदी असल्याने सर्वच ठिकाणी शांतता होती. गेल्या वर्षी तब्बल 112 डेसिबलपर्यंत नोंदला गेलेला आवाज या वर्षी ऐकायलाही मिळाला नाही. 

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

जुनी सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील गणेश मंडळे दरवर्षी गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी, दापोडी, फुगेवाडी, भोसरी, मोशीतील मंडळे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी (नववा किंवा दहावा दिवस) आणि पिंपरी, नेहरूनगर, खराळवाडी, मोरवाडी, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी, थेरगाव, काळभोरनगर, मोहननगर येथील मंडळे शेवटच्या दिवशी (अनंत चतुर्दशी) गणेश विसर्जन करतात.

मिरवणुकीदरम्यान ढोल- ताशा, डीजेचा दणदणाट सुरू असतो. शिवाय, दरवर्षी चिंचवडच्या चापेकर चौकात व पिंपरी कॅम्पातील कराची चौकात महापालिकेतर्फे मंडळांच्या मिरवणुकींचे स्वागत केले जाते. त्यासाठी मंडप उभारलेला असतो. त्यासमोर ढोल-ताशा पथके विविध खेळ साजरे करतात. यामुळे बारा तासांपेक्षा अधिक वेळ मिरवणुका सुरू असतात. मात्र, रात्री बारा वाजेपर्यंतच वाद्य वाजविण्यास परवानगी दिल्यापासून रात्री एक-दीड वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या मिरवणुका गेल्या पाच-सहा वर्षांपासून बंद झाल्या आहेत. मात्र, ध्वनिप्रदूषणात फरक पडलेला नव्हता. यंदा प्रथमच मिरवणुका न निघाल्याने स्वागत कक्षही नव्हता व पथकांचे खेळही नव्हते. त्यामुळे चौकांसह मिरवणूक मार्गांवरही शांतता बघायला मिळाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या वर्षीची ध्वनिपातळी 
ठिकाण/पातळी (डेसिबलमध्ये) 
झुलेलाल घाट पिंपरी/107 
मोरया घाट चिंचवड/110 
गणेश तलाव निगडी/112 
पीएमटी चौक भोसरी/107 
सांगवी पवना घाट/108 
मोशी इंद्रायणी घाट/112 

आवाज सहन करण्याची क्षमता 
डेसिबल/वेळ 
85/8 तास 
91/2 तास 
94/1 तास 
100/30 मिनिटे 
106/4 मिनिटे 
112/1 सेकंद 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Noise level dropped in Pimpri city