

PCMC Election
Sakal
- अमोल शित्रे
पिंपरी - महापालिका निवडणुकीत विविध पक्षांच्या मातब्बर उमेदवारांना ‘नोटा’ (या पैकी कोणीही नाही) मतांचा मोठा फटका बसला आहे. विजयासाठी आवश्यक असलेली मते नोटाला गेल्याने अनेक प्रभागांत क्रमांक दोनवर राहिलेल्या उमेदवारांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. हीच मते उमेदवारांच्या पारड्यात पडली असती, तर अनेक ठिकाणी निकालाचे चित्र बदलले असते. असे प्रमुख लढतींमधील मतांवरून दिसत आहे.