महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेला नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

महापालिकेच्या वाकड येथील मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया न करता थेट मुळा नदीत सांडपाणी सोडले जात आहे. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस नोटीस बजावली आहे.

पिंपरी - महापालिकेच्या वाकड येथील मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया न करता थेट मुळा नदीत सांडपाणी सोडले जात आहे. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस नोटीस बजावली आहे. तत्काळ जलप्रदूषण रोखून अत्यावश्‍यक उपाययोजना करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

रयत विद्यार्थी परिषदेने या बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केली होती. वाकड गावठाण स्मशानभूमीजवळील जलनिस्सारण विभागाच्या पाच दशलक्ष लिटर क्षमतेच्या मैला शुद्धीकरण केंद्रापर्यंत कोणतेही ड्रेनेज वाहिनी टाकण्यात आलेली नाही. या परिसरातील सांडपाणी प्रक्रियाविना सोडल्याने मुळा नदीपात्रातील जीवसृष्टी आणि नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी सोडले जात असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. वीज पुरवठा खंडित झाल्यास केंद्रात जनरेटरची सुविधा नसल्याचे दिसून आले. या संदर्भात तातडीने उपाययोजना करून थेट नदी पात्रात सांडपाणी सोडणे थांबवा, असे आदेश मंडळाने महापालिकेने दिले आहे. या बाबत खुलासा करण्याचे आदेशही महापालिकेस देण्यात आले आहेत. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice of Maharashtra Pollution Control Board to Municipal Corporation