शिक्षकांवर आली अतिशय वाईट वेळ; 'डिलिव्हरी बॉय'चं करावं लागतंय काम!

आशा साळवी
Tuesday, 26 May 2020

आपल्याकडं कोणतंही संकट आलं किंवा एखादं सरकारी काम करायचं असेल, तर शिक्षकांना वेठीस धरलं जातं.

पिंपरी : आपल्याकडं कोणतंही संकट आलं किंवा एखादं सरकारी काम करायचं असेल, तर शिक्षकांना वेठीस धरलं जातं. या कोरोनाच्या काळात अनेक शिक्षक आजही घराघरांत जाऊन कोरोनाची चाचणी घेताहेत, शिक्षकांनी रेशन दुकानावरील नोंदी पण घेतल्या अन्‌ दारूच्या दुकानांवर होणारी गर्दीदेखील नियंत्रित केली. आता एवढी कामे दिल्यानंतर त्यांच्यावरील भार कमी होईल, असे वाटत असतानाच आता शिक्षकांना 'डिलिव्हरी बॉय'चं काम दिले आहे. लॉकडाउन संपेपर्यंत त्यांना अजून काय कामं करावी लागतील माहित नाही, अशी परिस्थिती शिक्षकांची झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वत्र कोरोनाचे थैमान घातले असून, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. त्यानुसार या लढ्यात शिक्षक अधिग्रहीत करण्यात आला आहे. मार्च महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांना वेगवेगळ्या 'ड्यूटी' लावल्या आहेत. चेक पोस्टवर, दवाखान्यात, पोलिसांसोबत, रेशन दुकानावर आदी विविध आघाड्यांवर शिक्षक कार्यरत असतानाच, आता बीड जिल्ह्यातील पाटोदाच्या तहसीलदारांनी शिक्षकांना घरपोच किराणा माल तसेच, जीवनावश्‍यक वस्तू पोहोचवण्याचे काम दिले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या परिपत्रकावरून पुणे जिल्ह्यातील शिक्षक आक्रमक झाले आहे. साडेबारा हजार शिक्षक कार्यरत असून, आज त्यांना कामे दिली, उद्या आम्हाला कामे द्याल. त्यामुळे शिक्षकांची अवहेलना, प्रतारणा होत असल्याचा आरोप केला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"लॉकडाउनमुळे लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाहीये. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार अन्नधान्य, भाजीपाला, किराणामाल यासोबतच जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्यासाठी काम शिक्षकांना लावण्यात आले आहे. शिक्षकांना डिलिव्हरी बॉयची कामे देण्यात आली आहेत. शिक्षकांची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारा हा आदेश मागे घेऊन शिक्षकांना योग्यतेनुसार कामे द्यावीत.''
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now teachers have to work as delivery boys in beed patoda pimpri chinchwad