पिंपरी-चिंचवडमध्ये हळूहळू कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज एक हजार 219 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. आजपर्यंत बाधित रुग्णांची संख्या 59 हजार 966 झाली आहे. आज 557 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 48 हजार 651 झाली. आज शहरातील 14 व शहराबाहेरील पाच अशा 19 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. शहरातील एकूण मृतांची संख्या 980 झाली आहे. सक्रीय रुग्णसंख्या 10 हजार 335 आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज एक हजार 219 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. आजपर्यंत बाधित रुग्णांची संख्या 59 हजार 966 झाली आहे. आज 557 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 48 हजार 651 झाली. आज शहरातील 14 व शहराबाहेरील पाच अशा 19 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. शहरातील एकूण मृतांची संख्या 980 झाली आहे. सक्रीय रुग्णसंख्या 10 हजार 335 आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत झालेल्या व्यक्ती पिंपरी (पुरुष वय 83), आळंदी रस्ता भोसरी (पुरुष वय 74), भोसरी (पुरुष वय 42), रुपीनगर (पुरुष वय 70), नेहरूनगर (पुरुष वय 59), चिंचवड (पुरुष वय 90), निगडी (पुरुष वय 78) वाकड (पुरुष वय 45, स्त्री वय 74), रहाटणी (स्त्री वय 65), कासारवाडी (पुरुष वय 55), दिघी (स्त्री वय 65, पुरुष वय 87), खेड (स्त्री वय 64, 48 आणि पुरुष वय 60), लोणावळा (स्त्री वय 65, पुरुष वय 38) येथील रहिवासी आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona positive patients gradually increases in Pimpri Chinchwad