पिंपरी : विनापरवाना कीटकनाशकाचे उत्पादन केल्याप्रकरणी कंपनीवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

कृषी विभागाचे खत निरिक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक रविशंकर सिद्धेश्‍वर कावळे यांनी फिर्याद दिली. 

पिंपरी : शासनाची कोणतीही परवानगी न घेता कीटकनाशकाचे उत्पादन करीत त्याचा साठा व विक्री केल्याप्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मारूंजी येथे उघडकीस आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अमर सुरेश राऊत (वय 31, रा. पोलाइट कॅसलियम सोसायटी, गायकवाड नगर, आळंदी) याला अटक केली असून, मे. पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा.लि. कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कृषी विभागाचे खत निरिक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक रविशंकर सिद्धेश्‍वर कावळे यांनी फिर्याद दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मारूंजी येथील पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा.लि. कंपनीत आरोपींनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता 27 लाख 94 हजार 185 रुपये किमतीच्या कीटकनाशकाचे उत्पादन केले. त्याची साठवणूक व विक्रीही केली. ही बाब कृषी विभागाच्या निदर्शनास येताच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी येथील कर्मचारी राऊत याला अटक केली असून, संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: offense against the company for producing unlicensed pesticides in marunji