Old Mumbai Pune Highway Traffic
Old Mumbai Pune Highway Trafficsakal

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांचा 'फ्लो' वाढला

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या पाडकामामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक उर्से टोल नाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे.
Summary

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या पाडकामामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक उर्से टोल नाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे.

पुणे/पिंपरी - मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या पाडकामामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक उर्से टोल नाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहनांचा फ्लो वाढला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नियोजन केले असल्याने या मार्गाने पुण्याकडे जाणारी वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे. दरम्यान, सातारा, सोलापूर हून येणारी वाहतूक शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गे मुंबई दिशेने जात आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील वाहनांची संख्या सायंकाळ नंतर मोठ्या प्रमाणात वाढली.

सोलापूर, साताऱ्याहून मुंबई येथे जाणारे वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातून जाऊ लागली. शनिवारी सायंकाळी सहा वाजता पासून कात्रज, स्वारगेट बाजीराव रस्ता, शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच सोलापूर रस्त्यावर येणारे वाहतूक परिसर शिवाजीनगर गणेशखिंड, औंध, वाकड मार्गे मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात झाली बहुतांश वाहनांमध्ये खासगी बस, एस टी, ट्रक, तरकारी ट्रक, टेम्पो, पेट्रोल, डिझेल, दुधाचे टँकर, भाजीपाला ट्रक अशा वाहनांचा सर्वाधिक समावेश होता. त्याच बरोबर कार, मिनी बस व अन्य हलक्या वाहनांची संख्या ही लक्षणीय होती.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहनांचा 'फ्लो' वाढला

दरम्यान, जड वाहनांना उर्से टोल नाक्यापासून बंद करण्यात आला आहे. या मार्गाने येणारी इतर वाहने उर्से टोल नाका येथून सेंट्रल चौक मार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, पुणे मार्गे पुढे जात आहेत.तसेच किवळे चौकातून रावेत, डांगे चौक मार्गे, रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरून औंध, शिवाजीनगरमार्गे वाहने इच्छितस्थळी जात आहेत.

वाकड चौकातून डावीकडे वळूनही वाहने डांगे चौक मार्गे पुढे जात आहेत. दरम्यान, वाहन चालकांना पूर्वकल्पना असल्याने तसेच पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून योग्य नियोजन केल्याने जुन्या मुंबई पुणे महामार्गासह औंध रावेत मार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे.

राधा चौक ते बावधन वाहतूक सुरळीत; बावधन पासून कोंडीला सुरुवात

चांदणी चौकातील उड्डाण पूल पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून मुंबई बेंगलोर महामार्गावर कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. मुंबईहून साता-याकडे जाणारी वाहतूक वाकड, राधा चौक ते सुतारवाडी पर्यंत सुरळीत सुरू आहे परंतु पुढे बावधन पुलापासून कोंडीला सुरुवात झाली आहे.एकाचवेळी अनेक वाहने एकत्र आल्याने बावधन ते चांदणी चौकापर्यंत वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे.

रात्री 10 पर्यंत चांदणी चौकात वाहतूक कमी

चांदणी चौक येथे सध्या वाहतूक सुरू असली तरी आता रस्त्यावर वाहनांची संख्या कमी आहे. लवकरच येथून जाणारी वाहने बंद होतील. पोलिसांनी जागोजागी बॅरीकेड लावली असून हा परिसर निर्मनुष्य करण्याची तयारी सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com