पिंपरी-चिंचवडमध्ये केरळी बांधवांनी असा साजरा केला 'ओणम'

सुवर्णा नवले
Monday, 31 August 2020

केरळी बांधवांचा ओणम मंदिरात साजरा न होता सोमवारी (ता. 31) घरीच उत्साहात साजरा झाला.

पिंपरी : केरळी बांधवांचा ओणम मंदिरात साजरा न होता सोमवारी (ता. 31) घरीच उत्साहात साजरा झाला. सव्वीस प्रकारच्या पारंपरिक केरळी पंचपक्वानांचा आस्वाद कुटुंबीयांनी एकमेकांसोबत घेतला. आजही शहरातील सर्वधर्मीय बांधव मोठ्या भावनेने निगडी व पिंपळे गुरव येथील श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी येतात. दरवर्षी मंदिर गजबजून गेलेले असते. यावर्षी भाविकांनी घरीच श्रीकृष्णाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. 

#JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब ? (व्हिडिओ)

सकाळी मंदिरात दुग्धाभिषेक, आरती, पूजा व मांगल्यदर्शन झाले. मंदिरात मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत विधी पार पाडण्यात आले. दरवर्षी महिला पांढऱ्या रंगाच्या सोनेरी काठाच्या साड्या घालून केरळी पेहरावात मंदिरात येतात. पुरुषांनी धोतर परिधान केलेले असते. सर्व ठिकाणी सेल्फि अन्‌ आनंददायी वातावरणात एकमेकांच्या छबी टिपल्या जातात. मात्र, या वर्षी सर्व आनंदाला मुरड घालावी लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निगडी प्राधिकरण व चिंचवड येथे केरळी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. निगडीतील मंदिरात आकर्षक फुलांची लक्षवेधी सजावट करण्यात आली होती. महिलांनी रामाची प्रतिकृती रांगोळीतून साकारली होती. दिव्यांच्या रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते. दरवर्षी भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात प्रसाद व अन्नदानाचे वाटप करण्यात येते. यावर्षी साध्या पद्धतीने केवळ पूजा करण्यात आली. दरवर्षी भाविक केरळमध्ये जाण्यासाठी हजेरी लावतात. मात्र, कोरोनामुळे यावर्षी ते जमले नाही. प्रसाद म्हणून विविध प्रकारच्या गोड खीर घरोघरी बनविल्या होत्या. केरळी बांधवांनी एकमेकांच्या घरी हजेरी लावून केळीच्या पानावर भोजनाचा आस्वाद करून आनंद द्विगुणित केला. या पावन पर्वाच्या सोशल मीडियावर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व "कोरोनाचे सावट लवकर दूर होऊ दे' ही मनोमन प्रार्थना ईश्‍वरचरणी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onam festival celebration by kerala brothers in pimpri chinchwad