#JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब ? (व्हिडिओ)

justice for kaku funny video and memes viral on social media
justice for kaku funny video and memes viral on social media

पुणे : सोशल मीडियावर कालपासून घरकाम करणाऱ्या एका काकूंचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. त्यावर मिम्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर व व्हॉट्सअपवर या व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय. एकीकडं या गोष्टीची खिल्ली उडवतायेत, तर दुसरीकडं सहानुभूती दाखवली जातेय. नक्की काय आहे हा व्हिडिओ, जाणून घेऊयात.

बॅचलर मुलांनी घरकामासाठी एका काकूंना कामावर ठेवलंय. त्यांच्या कामाचे पैसे अठराशे रुपये देण्याचं ठरलं होतं. त्यानूसार त्या मुलांनी काकूंना पैसे दिलेही. मात्र, त्यांच्या हिशोबात गल्लत होत असल्यानं त्यांना अठराशे रुपयांचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळं त्या मुलांकडं पैसे घेण्यासाठी त्यांच्या रुमवर गेल्या. ठरल्याप्रमाणं अठराशे रुपये द्यायचे होते. मग, तुम्ही दीड हजार अन् तीनशे रुपयेचं का दिले? मला अठराशे रुपये पूर्ण हवेत. त्याशिवाय मी इथून जाणारच नाही, असं काकू मुलांना सांगतायेत.

व्हिडिओमध्ये मुलगा आणि काकू, असे दोन जण दिसतायेत. तर हा सगळा प्रकार रुमवरच्याच एका मुलाने रेकॉर्ड केलाय. त्याच्या शेजारी अजून एकाचा आवाज ऐकू येतोय. या व्हिडिओमध्ये तरुण त्या काकूंना सांगतोय, की आज सकाळीच तुम्हाला अठराशे रुपये दिले. त्यामुळं तुम्ही एक्स्ट्रा पैसे कशाचे मागतायेत? त्यावर काकू म्हणतायेत, की तुम्ही पाचशेच्या तीन आणि तीनशे रुपये दिले. हे दीडच हजार झाले. ते अठराशे रुपये थोडीच होतात. मला माझे अठराशे रुपये द्या. मी उद्यापासून कामाला येणार नाही, असा तो वाद व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार; यंदा शहरात ५९४.२ मिलिमीटर पावसाची नोंद

काकू ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळं तो तरुण व्हिडिओ काढणाऱ्या मित्राला विचारतो, भाई कितने पैसे दिए? त्यावर तो म्हणतो, अठराशे रुपये दिले. पाचशेच्या तीन नोटा, एक दोनशेची आणि एक शंभरची नोट, असे अठराशे रुपये दिल्याचं तो सांगतो. पण, काही केल्या काकूंना तो हिशोब कळत नाही. हा प्रकार काही मिनिटे तसाचं सुरू असल्याचं दिसतं. शेवटी मुलं म्हणतात, की अठराशे रुपये म्हणजे किती होतात, ते आम्हालाही माहिती नाही तुम्हीच सांगा? त्यावर त्या काकू म्हणतात तुम्ही अठराशे रुपये दिलेच नाहीत. अन् व्हिडिओ तिथेचं संपतो. पुढे त्या हिशोबाचं काय झालं. काकूंना अठराशे रुपयांचं गणित सुटलं, की नाही माहिती नाही. पण हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय.

एकीकडं खिल्ली, तर दुसरीकडं सहानुभूती

काहींना गमतीशीर वाटणारा हा प्रकार अनेकांनी सिरियस्ली घेतलाय. सोशल मीडियावर #JusticeForKaku असा ट्रेंडच काहींनी सुरू केलाय. तर काहींनी अठराशेची नोट तयार करून शेअर केलीय. मात्र, काकूंच्या भाबडेपणाचं असं भांडवलं करण योग्य नाही. त्यांची मदत करा, असे मॅसेजही व्हायरल होतायेत.

समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम
 

(edited by sharayu kakade)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com