कामशेत परिसरात गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथकाने कामशेत हद्दीतील नायगाव येथून गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले

कामशेत : पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथकाने कामशेत हद्दीतील नायगाव येथून गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 
गुरुवारी (ता. २८) करण्यात आली. अनिल धराडे (वय २५, रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह गुरुवारी कामशेत परिसरात गस्त घालत होते. यावेळी दहशतवादविरोधी पथकाचे राजेंद्र मिरघे यांना आरोपी अनिलने बेकायदेशीर बिगरपरवाना शस्त्र बाळगल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथकाने त्याला कामशेत हद्दीतील नायगाव फाटा येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याला पुढील तपासासाठी कामशेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पद्माकर घनवट, कामशेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक मोहिते, सहायक उपनिरीक्षक रजाक शेख, विश्वास खरात, हवालदार राजेंद्र मिरघे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी या पथकाने कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested for carrying a pistol in Kamshet area