देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीकारक व्हिडिओप्रकरणी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 March 2021

राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडिओ युट्युबवर अपलोड केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडिओ युट्युबवर अपलोड केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2 मार्चला आरोपी युवराज दाखले याने युट्युबवर राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामी करणारा मजकूर असलेला व्हिडिओ अपलोड केला. अपलोड केलेल्या व्हिडिओचा कुठल्याही प्रकारचा पुरावा दाखले याच्याकडे नसताना हा व्हिडिओ अपलोड केला. यामुळे फिर्यादी महिला कार्यकर्त्या आणि पक्षातील इतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असंतोष आणि रोष निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नितीन लांडगे

दाखले याने गंभीर आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one arrested in defamatory video case of devendra fadnavis at wakad