मावळ : खामशेतजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खामशेतजवळ ट्रक व दुचाकीची धडक झाली.

कामशेत (ता. मावळ) : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खामशेतजवळ ट्रक व दुचाकीची धडक झाली. त्यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (ता. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रोहिदास गंगाराम काटकर (वय ४७) यांचा मृत्यू झाला असून, बाळू वामन काटकर (वय ४७, दोघे रा. पारवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत रुग्णवाहिका चालक कैसर रसीद शेख (रा. कामशेत) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खामशेतच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर हायटेशन टॉवरजवळ ट्रक (एमएच ४६, ई १३८९) व मोटारसायकल (एमएच १४, ईके ०६६९) यांची धडक झाली. त्यात रोहिदास काटकर हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाळू काटकर हे जखमी झाले. या अपघाताची माहिती एका ट्रक चालकाने कैसर शेख यांना दिली. त्यावेळी ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one death in truck-bike accident near khamshet