पुणे : 2 फरार आरोपी जेरबंद; बिनविरोध निवडून आल्यावर केला होता हाफ मर्डर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

किरकटवाडी (पुणे) : येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य शेखर पारगे यांच्यावर वार करून फरार झालेल्या दोन मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात हवेली पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी हल्ल्यामध्ये वापरलेली तलवार आणि एक कोयता पोलिसांनी शोधून काढला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

पुण्यासह राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आता MSRDCकडे!​

सज्जद शेख आणि शाकीर शेख (दोघेही रा.डोणजे, ता.हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. 5 जानेवारी रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास दारू पिल्यानंतर झालेल्या शिवीगाळीतून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जिव्हाळा फार्महाउस येथे आरोपी सज्जद शेख, शाकीर शेख आणि इतर दोघांनी शेखर पारगे यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केले आणि चौघेही तेथून पसार झाले होते.

'भाजपनं पाठीत खंजीर खुपसला'; JDU नेत्यांनी नितीश कुमारांसमोर मांडल गाऱ्हाणं!​

घडलेली घटना गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार हे स्वतः या घटनेचा तपास करत होते. दरम्यान आरोपी डोंगरावर लपलेले असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत हवेली पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलिस हवालदार संजय शेंडगे, रामदास बाबर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धनवे,राजेंद्र मुंढे, वानोळे व होमगार्डचे जवान यांनी सापळा रचून आरोपींना नांदोशी (ता.हवेली) येथील वनविभागाच्या हद्दीतून अटक केली.इतर दोघांनाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

CM खट्टर यांच्या विरोधात बळीराजा रस्त्यावर; पोलिसांकडून लाठीचार्ज अश्रूधूर अन् पाण्याचा मारा​

आरोपी करत होते पोलिसांची दिशाभूल 

आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली हत्यारे ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आरोपींनी अगोदर हल्ला केल्यानंतर हत्यारे डोंगरावर फेकून दिल्याचे सांगितल्याने त्या परिसरात कमरेच्या वर वाढलेल्या गवतात हवेली पोलिस हत्यारे शोधत होती. मात्र अनेक वेळा शोधूनही हत्यारे सापडत नव्हती. अखेरीस पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करणे थांबवले आणि  तलवार व कोयता ज्या ठिकाणी जमिनीत पुरून ठेवले होते ते ठिकाण दाखवले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police arrested two accused who fled after attacking member elected unopposed in Gram Panchayat elections