स्टीलच्या पट्टया अंगावर पडून एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

आरोपीची मोहननगर येथील कमानीजवळ रिद्धी इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. आरोपीने सुरक्षिततेच्या साधनांचा अवलंब न करता स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या या रॅकमध्ये न ठेवता बाहेर ठेवल्या. 

पिंपरी : कंपनीत ठेवलेल्या स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर झाला. ही घटना चिंचवडमधील मोहननगर येथे घडली. 

लक्ष्मण दत्तू जाधव (वय 45, रा. चिखली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर हर्षल जितेंद्र चव्हाण (रा. चिखली) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुकेश बोहरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजू गणेश पाटकर (रा. रामनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

हे ही वाचा : वालचंदनगर कंपनीने केली बुस्टरची निर्मिती; चाचणी करणारी देशातील एकमेव कंपनी

आरोपीची मोहननगर येथील कमानीजवळ रिद्धी इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. आरोपीने सुरक्षिततेच्या साधनांचा अवलंब न करता स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या या रॅकमध्ये न ठेवता बाहेर ठेवल्या. दरम्यान, शुक्रवारी (ता.11) सकाळी अकराच्या सुमारास या पट्ट्या तेथील कामगार जाधव व चव्हाण यांच्या अंगावर पडल्या. यामध्ये जाधव गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर चव्हाण यांच्यावर उपचार सुरू आहेत. निष्काळजीपणाने स्टीलच्या पट्ट्या ठेवून जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी बोहरा याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

हे ही वाचा : गेली अनेक वर्षे माडगूळकर कुटुंबीय गदिमांच्या स्मारकासाठी प्रयत्न करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies after falling steel straps