सुरूवातील सेफ असणाऱ्या मावळ तालुक्यास धक्का

corona.jpgcorona.jpg
corona.jpgcorona.jpg

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात बुधवारी इंदोरी येथील सहा, तळेगाव येथील तीन, वराळे, सोमाटणे व ब्राम्हणोली येथील प्रत्येकी एक अशा एकूण उच्चांकी बारा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून लोणावळा येथील कोरोनाबाधित ५७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरी पार करून १११ वर पोचली आहे. तर मृतांची संख्या पाच झाली आहे.

लोणावळा येथील एका ५७ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास झाल्याने २४ तारखेला तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २६ तारखेला तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिचा बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला. तिला यकृताचाही आजार होता.

इंदोरी येथील एका ५५ वर्षीय वाहन चालकाला २९ तारखेला लक्षणे आढळल्याने तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथून ३० तारखेला कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले. त्याच्यासह त्याची पत्नी, मुलगा, दोन मुली अशा पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

इंदोरी येथीलच ६० वर्षीय पुजाऱ्याला लक्षणे आढळल्याने तो ३० तारखेला चिंचवड येथील  रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील १४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. 

तळेगाव येथील पेस्ट कंट्रोलचे काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय पुरुषाला लक्षणे आढळल्याने ३० तारखेला कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब घेण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील पाच जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. तळेगाव येथील एका हौसिंग सोसायटीमधील ३६ वर्षीय गृहिणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिचा पती ज्या ठिकाणी नोकरीस आहे तेथील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. लो रिस्क संपर्कातील म्हणून यांचा स्वॅब घेण्यात आला होता.

तळेगाव स्टेशन विभागातील एका ४१ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास जाणवल्याने २८ तारखेला चिंचवड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे २९ तारखेला स्वॅब घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील तीन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. वराळे येथील एका ३४ वर्षीय वाहन चालकाला लक्षणे जाणवल्याने ३० तारखेला तेथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पवन मावळातील ब्राम्हणोली येथील एका ६८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. श्वसनाचा त्रास झाल्याने त्याला २८ तारखेला चिंचवड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या संपर्कातील सात व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. सोमाटणे येथील एका ३७ वर्षीय कामगाराला लक्षणे जाणवल्याने तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

दरम्यान, बुधवारी उच्चांकी बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या १११ झाली आहे. त्यात शहरी ४३ तर ग्रामीण ६८ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ३६ जणांची नोंद झाली आहे. तालुक्यात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून ४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com