पिंपरी : वाघेरे प्रतिष्ठानकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत; अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपुर्द 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

माजी महापौर भिकू वाघेरे पाटील स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करून भिकू वाघेरे प्रतिष्ठानतर्फे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

पिंपरी : माजी महापौर भिकू वाघेरे पाटील स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करून भिकू वाघेरे प्रतिष्ठानतर्फे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी धनादेश सुपूर्द केला. या वेळी महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ आदी उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, महापौर उषा ढोरे यांनी भिकू वाघेरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक राहुल कलाटे, उषा वाघेरे, रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, गिरीजा कुदळे, शांती सेन, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, फजल शेख आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात १०५ जणांनी सहभाग घेतला. त्यांना सॅनिटायझर, नॅपकिन व प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या देण्यात आल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one lakh to cm assistance fund from waghere pratishthan at pimpri chinchwad