पिंपरी-चिंचवड शहरात 164 नवीन रुग्ण; दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

काल मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिंचवड (वय 73) येथील रहिवासी आहेत. काल शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झालेला नाही. शिवाय, काल शहराबाहेरील केवळ दोन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात काल164 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 86 हजार 800 झाली आहे. काल 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 83 हजार 18 झाली आहे. सध्या दोन हजार 273 सक्रिय रुग्ण आहेत. काल शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 509 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 622 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिंचवड (वय 73) येथील रहिवासी आहेत. काल शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झालेला नाही. शिवाय, काल शहराबाहेरील केवळ दोन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''माझे कुटुंब माझी जबाबदारी'' मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यासाठी एक हजार 314 पथके नियुक्त केले आहेत. कालपर्यंत 21 लाख 31 हजार 696 नागरिकांची तपासणी केली. त्यात चार हजार 919 व्यक्तींच्या घशातील द्रावांचे नमुने तपासण्यात आले. त्यात 169 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेत. 

तब्बल पावणे अकरा लाखाच्या मेफेड्राॅनसह 16 लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघाना अटक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One patient died and 164 new patients found in Pimpri-Chinchwad city