छोटा राजनच्या नावानं त्यानं मागितली होती खंडणी, पण...

छोटा राजनच्या नावानं त्यानं मागितली होती खंडणी, पण...

कामशेत (ता. मावळ) : छोटा राजन व बाबा बोडके याचे नावाने धमकावून जबरदस्ती खंडणी मागणाऱ्या व खंडणी न दिल्यास अपहरणाची धमकी देणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून, त्याला पुढील तपासासाठी कामशेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी अनिल सेामजी (वय ५९,  रा. बोट क्लब रोड, पुणे) यांनी गुरुवारी (ता. ९) कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विकी पोपट गायकवाड (वय २२, रा. जांभुळ ता. मावळ) या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. 

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात व त्यानंतर २९ जून रोजी कामशेत ते कुसगाव रोडवर महामार्गाच्या कडेला आरोपी विकी गायकवाड याने अनिल सेामजी यांच्या वृद्ध आश्रमामध्ये सिक्युरिटीचे काम द्यावे व ते दिले नाही, तर त्या पोटी दरमहा २५ हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी केली. याकडे फिर्यादी यांनी दुर्लक्ष केल्यानंतर आरोपीने गुरुवारी सकाळी व्हॉटसअपवर दहा मेसेज पाठवले. तसेच, छोटा राजन त्याचा मुलगा संकल्प व बाबा बोडकेच्या नावाने धमकी देऊन अपहरण करण्याची धमकी दिली. त्यानंतर अनिल सेामजी यांनी आरोपीविरुद्ध कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीस कामशेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक घनवट, सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक निरीक्षक विजय पाटील, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक उपनिरीक्षक दत्तात्रेय जगताप, हवालदार प्रकाश वाघमारे व गणेश महाडीक आदींनी कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com