मटण खाण्यास नकार दिल्यानं काळेवाडीत एकावर चाकूने वार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

मटण खाण्यास नकार दिल्याच्या रागातून एकावर चाकूने वार केल्याची घटना काळेवाडी येथे घडली. 

पिंपरी : मटण खाण्यास नकार दिल्याच्या रागातून एकावर चाकूने वार केल्याची घटना काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. 

बबन (पूर्ण नाव माहीत, रा. हनुमान मंदिरासमोर, काळेवाडी गावठाण, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नागेश शिवाजी कदम (वय 48, रा. हनुमान मंदिरासमोर, काळेवाडी गावठाण, वाकड) यांनी फिर्याद दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शुक्रवारी (ता. 18) रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी हे घरासमोर असताना 'चल जेवायला मटणाची भाजी केली आहे', असे आरोपी त्यांना म्हणाला. त्यावर मटणाची भाजी खात नाही, असे फिर्यादी म्हटल्याचा राग आल्याने आरोपीने त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. फिर्यादीने प्रतिकार करताच आरोपीने त्याच्या जवळील चाकूने त्यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांच्या हातावर, डोळ्यावर जखम झाली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one stabbed for refusing to eat mutton in kalewadi

Tags
टॉपिकस
Topic Tags: