पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान! थुंकल्यास होणार हजार रुपयांचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

महापालिका स्थायी समिती सभेसमोर प्रस्ताव 

पिंपरी : कोरोना संसर्गाचा प्रसार थुंकी व शिंकण्याद्वारे होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, दीडशे रुपये दंड आकारणी केली जात आहे. मात्र, संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने थुंकतांना आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्याचा विचार महापालिका करीत आहे. या बाबतचा प्रस्ताव बुधवारच्या (ता. 16) स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

पिंपरी-चिंचवडमधील कोविड केअर सेंटरची 'केअर' आता खासगी संस्थांकडे 

पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सध्या सर्वच प्रकारच्या थुंकीबहाद्दरांवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. थुंकताना आढळल्यास दीडशे रुपये आणि तोंडाला मास्क नसल्याच पाचशे रुपये दंडाची आकारणी केली जात आहे. दंड भरण्यास नकार देणाऱ्यांवर खटले भरले जात आहेत. गेल्या 23 एप्रिलपासून ही कारवाई सुरू आहे, तरीही अनेक जण मास्क न लावता फिरताना दिसत असून, थुंकणाऱ्यांची संख्याही कमी झालेली नाही. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. 

असा आहे प्रस्ताव 
- थुंकल्यास एक हजार रुपये दंड 
- मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड 

सद्यःस्थिती काय आहे 
- थुंकल्यास दीडशे रुपये दंड 
- मास्क नसल्याच पाचशे रुपये दंड 

गेल्या सहा महिन्यात 
- थुंकणाऱ्या सुमारे पाच हजार जणांकडून साडेसात लाख दंड वसूल 
- मास्क नसणाऱ्या साडेतीन हजार नागरिकांकडून 17 लाख 50 हजार दंड वसूल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one thousand rupees fine for spitting at pimpri chinchwad