esakal | पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

शहरात सोमवारपासून (ता. 14) लॉकडाउन केले जाणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात सोमवारपासून (ता. 14) लॉकडाउन केले जाणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, लॉकडाउनची अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी, "कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन जाहीर केला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये,' असे आवाहन केले आहे. 

हार मानतील ते आयटीयन्स कसले; पाहा ते आता काय करतायेत

आता पोस्टातून मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम 

पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर वस्तुस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 11) पुण्यात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हापासून लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियातून तर, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा केल्याची अफवा शहरात पसरली आहे. मात्र, ""पिंपरी-चिंचवड महापालिकेने लॉकडाउनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या लॉकडाउनच्या वृत्तामध्ये काहीही तथ्य नाही. त्यावर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये,'' असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची रेबीज लशीसाठी धावपळ 

दरम्यान, शहरातील लॉकडाउन शिथिल करण्याबाबत व्यापाऱ्यांनी आग्रह धरला होता. तसेच उद्योजक आणि इतर क्षेत्रांमधून लॉकडाउन उठविण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनबाबत नियम शिथिल करण्यात आले. मात्र, पालकमंत्री पवार यांच्या बैठकीनंतर पुन्हा शहरात लॉकडाउन होणार असल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही लॉकडाउनचे संकेत, अशी बातमी व्हायरल झाली. मात्र, ही केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 

loading image
go to top