खंडाळ्यात आणखी एक महिला पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनाने नेताजी वाडी, खंडाळा बाजारपेठ कंटेन्मेंट आणि बफर झोन जाहीर केला आहे.

लोणावळा : खंडाळ्यात बुधवारी आढळलेल्या ७४ वर्षीय वृद्धाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील ३२ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली आहे. वृद्धाच्या संपर्कातील नऊ जणांचे नमुने चाचणीसाठी  पाठविण्यात आले होते. पैकी वृद्धांच्या सुनेचा अहवाल पॉझिटिव्ह, तर इतर आठ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील करोना रुग्णांची संख्या दोन झाली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनाने नेताजी वाडी, खंडाळा बाजारपेठ कंटेन्मेंट आणि बफर झोन जाहीर केला आहे. संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण ८ जणांना तळेगाव येथील हॉर्टिकल्चर सेंटर येथील कोविड केअर केंद्रात पाठविण्यात आले आहे. तर लोरिस्कमधील ७३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकी ३० जणांना होम क्वारंटाइन, तर ४३ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one woman corona positive in khandala lonawala