esakal | पिंपरी : नामांकित कॉलेजचा व्यवस्थापन कोटा ‘सरेंडर’
sakal

बोलून बातमी शोधा

 Admission

पिंपरी : नामांकित कॉलेजचा व्यवस्थापन कोटा ‘सरेंडर’

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील पाच नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांनी आपला अकरावी प्रवेशाचा व्यवस्थापन कोटा अकरावी प्रवेश समितीकडे (सरेंडर) जमा केला आहे. त्यामुळे हवे तेवढे पैसे देऊन प्रवेश घेण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थी व पालकांना आता ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतून मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागणार आहे. परिणामी १९७ जागा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत वर्ग झाल्या आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. शहरात सर्वच कनिष्ठ महाविद्यालयात इनहाऊस प्रवेश कोटा आहे. तर उर्वरित वरिष्ठ माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये ही बिगर अल्पसंख्याक आहेत. तेथे इनहाऊस कोटा लागू होतो. सध्या या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा इनहाऊस कोटा २० टक्के आरक्षित केला आहे. त्यानुसार अकरावीचे प्रवेश दिले जातात. एसईबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इनहाऊस १० टक्के आरक्षण लागू झालेले आहे. मात्र व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने करण्याचे बंधन कनिष्ठ महाविद्यालयांना आहे.

मात्र, व्यवस्थापन कोट्यातील मर्यादित जागांसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकप्रतिनिधींकडून शिफारस केली जाते. एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश देणे शक्य झाले नाही, तर त्यावरून वाद निर्माण होतो. त्यामुळे शहरातील ५ नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांनी आपला व्यवस्थापन कोटा अकरावी प्रवेश समितीकडे जमा केला आहे. त्यात अमृता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, निगडी, सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कनिष्ठ महाविद्यालय, श्री फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवड, श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी आणि थेरगावातील मराठवाडा मित्र मंडळ (एमएम) महाविद्यालय यांचा समावेश आहे.

हेही वाचा: बजाज फाउंडेशन करणार शहरातील भटक्या श्‍वानाचे मोफत निर्बिजीकरण

दरम्यान, समितीकडे सरेंडर केलेला कोटा महाविद्यालयाला पुन्हा दिला जाणार नाही, असे अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया समितीच्या सदस्य मीना शेंडकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रीय प्रवेशप्रक्रियेच्या नियमित फेऱ्या संपल्यानंतर विद्यार्थी शिल्‍लक राहिल्यास या जागांवर विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेजातील कोट्याच्या रिक्‍त जागांवर आता ऑनलाइन केंद्रीय प्रक्रियेतून प्रवेश देण्यात येणार आहेत.

महाविद्यालय- जागा- सरेंडर -प्रवेशित-रिक्त जागा

श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय- १०३ ४० १० ५३

श्री फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालय - ५० ५० ०० ००

थेरगावातील मराठवाडा मित्र मंडळ (एमएम) महाविद्यालय- २० २० ०० ००

सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कनिष्ठ महाविद्यालय- १२ १२ ०० ००

अमृता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, निगडी- १२ १२ ०० ००

loading image
go to top