esakal | महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' पुरस्काराविनाच!
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

शिक्षकदिन तीन दिवसावर ! यंदा महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला?

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - महापालिकेच्यावतीने (Municipal) दरवर्षी शिक्षकदिनी (Teachers Day) (ता. ५) शहरातील गुणवंत शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ (Aadarsh Shikshak Puraskar) देऊन गौरविण्यात येते. मात्र यंदा शिक्षकदिन अवघा तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरी शिक्षण विभागाकडून अद्याप शिक्षकांकडून प्रस्तावच मागवले गेले नाहीत. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाबाबत महापालिकेने कोणतीही घोषणा केली नाही. यंदा महापालिकेला आदर्श शिक्षक पुरस्काराचा विसर तर पडला नाही ना ? अशी प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त करीत आहेत.

कोरोनाच्या प्रभावाने सारे व्यवहारच थंडावले आहेत. शिक्षण क्षेत्रावर तर त्याचा अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. शाळा, परीक्षा हे सगळेच सध्या थंड बस्त्यात आहे. एवढेच नव्हे तर दरवर्षी घोषित होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारावरही यंदा मोठे प्रश्‍नचिन्ह लागले आहे. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. मात्र यंदा कारण शिक्षक दिन तीन दिवसावर येऊन ठेपला असूनही अजूनही शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले नाहीत. दरवर्षी शिक्षक पुरस्काराच्या प्रक्रियेला जुलैअखेरीस प्रारंभ होतो. प्रस्‍ताव मागितलेले जातात. प्रस्तावाची विविध स्तरावर छाननी होते. मुलाखती घेतल्या जातात. यंदा मात्र या प्रक्रियेला अद्याप सुरवातच झाली नसल्याने महापालिकांसह खासगी शिक्षकांत नाराजीचे वातावरण आहे. पुरस्काराविषयी अद्याप अनिश्‍चितता आहे. अजून याबाबतची कुठलीही माहिती न आल्याने शिक्षक वर्तुळात नाराजी पसरली आहे. सध्या शहर कोरोनाच्या गर्तेत सापडले असल्याने महापालिकेला शिक्षकांचे कौतुक करण्याचा विसर तर पडला नाही ना? अशी शिक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: Pimpri : अकरावीसाठी कॉलेज कोटा ‘मॅनेज’

शिक्षकांच्या मते...

एका शिक्षकाने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘‘आदर्श शिक्षक पुरस्कार हा शिक्षकांसाठी मोठा गौरवाचा क्षण असतो. तो मिळवावा, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते आणि ते त्या दृष्टीने प्रयत्नही करत असतात. गेल्या वर्षीपासून सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. महापालिकेने ऑनलाइन अर्ज मागविण्यास काही हरकत नव्हती, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. कोरोना काळात ज्या शिक्षकांनी काम केले आहे, त्यांचा कार्यगौरव होणे आवश्‍यक होते. सलग दोन वर्षे शिक्षक कोविड ड्यूटी करत करत विद्यादान करत आहेत, त्यांचे कौतुक होणे आवश्‍यक असल्याचे मत एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी मांडले. कोरोनात आदर्श शिक्षक पुरस्कारचे अर्जही ऑनलाइन मागविले पाहिजे होते. ऑनलाइन शिक्षकाची निवड जाहीर केली असती, तरी हरकत नव्हती, असे मतही काही शिक्षकांनी नोंदविले. सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेता शिक्षण क्षेत्रातील सर्व कामकाज ऑनलाइन सुरू आहे. पुरस्कारांचे अर्जही ऑनलाइन मागवणे शक्य होते, मात्र ते केले नाही, असे मत काही शिक्षक संघटनांनी व्यक्त केले.

‘कोरोनाच्या प्रभावामुळे शिक्षण दिन साजरा करणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षकांनी शाळास्तरावर कार्यक्रम घ्यावा. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना सहभागी करून घ्यावे. कोरोनाचे नियम पाळून यंदा हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.’

- संदीप खोत, उपायुक्त प्राथमिक शिक्षण विभाग

loading image
go to top