
तळेगाव दाभाडे : विवाह संकेतस्थळावरून ओळख करायची. कधी पायलेट तर कधी इंजिनिअर असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर परदेशातून महागड्या भेटवस्तू पाठविण्याच्या नावाखाली बनावट कस्टम अधिकाऱ्याच्या मदतीने फसवणूक करायची. सोशल मीडियावरील विशेषतः संकेतस्थळांवर विवाहाच्या शोधात असलेल्या वर-वधूंच्या बाबत हे प्रकार घडत आहेत.