पिंपरी : शिक्षण विभागाचे वराती मागून घोडे; बारा दिवसांनी शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण

पिंपरी : शिक्षण विभागाचे वराती मागून घोडे; बारा दिवसांनी शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण
Updated on

पिंपरी : ऑनलाइन शाळा 15 जूनपासून सुरू झाली. परंतु, काही महापालिका शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी जमलेच नाही. मात्र, आता कोरोनातही शिक्षण सुरू ठेवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शिक्षण विभाग व एलएफई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी विविध विषयांवर 'ऑनलाइन विकास मंच' सुरू केला आहे. दुसरीकडे मात्र, शाळा सुरू होऊन बारा दिवस उलटून गेल्यामुळे शिक्षण विभागाचे 'वराती मागून घोडे' या म्हणीप्रमाणे कारभार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. 

सर्व शाळांनी शासन निर्णयानुसार 15 जूनपासून अधिकृतपणे ऑनलाइन शाळा भरविण्यास सुरुवात केली आहे. अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन वर्ग घेतले. मात्र, बहुतांशी शिक्षकांना कोरोना ड्युटी लावल्यामुळे अनेक महापालिकेच्या काही शाळा भरल्याच नाहीत. यावरून महापालिकेच्या शिक्षण विभागावर टीका झाली. त्यामुळे बारा दिवसांनी का होईना महापालिकेने शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण कसे देता येईल, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी, जीवन कौशल्ये, या शतकामध्ये लागणारी कौशल्ये व तंत्रज्ञानाचा (गुगल फॉर्म, क्विज, स्लाईड्‌स) शिक्षणात प्रभावी वापर कसा करायचा आदी विषयांवर तज्ज्ञांसोबत संवाद होणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याच मालिकेच्या पहिल्या भागामध्ये पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेश बनकर व एलएफई संस्थेच्या सदस्यांनी दिक्षा ऍपबद्दल माहिती देण्यात आली. 'दीक्षा' ऍप हे केंद्र सरकारचे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठीचे अधिकृत ऍप आहे. हे ऍप विद्यार्थ्यांना कसे महत्वाचे आहे, यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, हे वापरत असताना शिक्षकांना येणाऱ्या समस्या यावर विस्तृत चर्चा झाली. हा संवाद फेसबुकद्वारे शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी मिळून साधरणत: 750 जणांपर्यंत पोहोचला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यवेक्षक अनिता जोशी म्हणाल्या, "या कोविडच्या काळात ही संवाद मालिका शिक्षकांना व मुख्याध्यापकांना उपयुक्त असून, याचा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत चांगले शिक्षण पोहोचवण्यासाठी होईल. पीसीएमसी शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व सर्व पर्यवेक्षक सहकार्याने ही मालिका पुढे अशीच सुरू राहणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com