esakal | 'मावळातील पर्यटनस्थळे खुली करा', व्यावसायिक संघटनेची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

'मावळातील पर्यटनस्थळे खुली करा', व्यावसायिक संघटनेची मागणी

मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळ्यासह ग्रामीण भागातील ३१ पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

'मावळातील पर्यटनस्थळे खुली करा', व्यावसायिक संघटनेची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा (पुणे) : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील पर्यटन ठप्प झाले आहे. ग्रामीण अर्थकारणाचा गाडा रुळावर आणण्यासाठी मावळातील पर्यटनस्थळे खुली करावीत, अशी मागणी मावळ तालुक्यातील ग्रामीण व्यावसायिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळ्यासह ग्रामीण भागातील ३१ पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी तत्काळ मागे घेत ग्रामीण भागातील सर्व उद्योगधंदे पुर्ण क्षमतेने सुरू करावेत, अशी मागणी मावळ ग्रामीण व्यावसाय संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मावळचे आमदार सुनील शेळके यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. सध्या व्यावसायिक व लहान-मोठे व्यावसायिक अडचणी आले आहेत. या संकटावर तोडगा काढण्यासाठी कार्ला येथे व्यावसायिकांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामीण व्यावसाय संघटनेचे पदाधिकारी प्रसाद बागवे, भाऊसाहेब हुलावळे, प्रताप डिंमळे, निरंजन बोत्रे, संजय देवकर, सतिश मोरे, विजय तिकोणे, संतोष येवले, विकी बागवे, किसन येवले, संजय मोरे आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळ निसर्ग संपदेने समृद्ध आहे. येथील अर्थकारण मावळच्या ग्रामीण भागातील प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. अनेक गडकिल्ले, प्राचीन लेण्या, तलाव तसेच, प्रसिद्ध ठिकाणांमुळे लाखोंच्या संख्येने पर्यटकांचा राबता असतो. मात्र, कोविडच्या संकटात अडकल्याने मावळातील पर्यटनस्थळे सध्या बंद करण्यात आली आहे. ऐन हंगामात पर्यटनास बंदी घातल्याने अनेकांचे व्यवसाय बुडाले, लहान-मोठे व्यावसायिकांवर संक्रांत आली. टुरीस्ट, टॅक्सी, रिक्षाचालकांचे आर्थिक संकटामुळे हाल होत आहेत. देशभरात सध्या लॉकडाउन हळूहळू काढण्यात येत असल्याने आमच्यावरच हा अन्याय का, असा सवाल करत आवश्यक ती काळजी घेत व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांच्या वतीने बैठकीत करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मावळ व्यवसाय संघटनेचे पदाधिकारी प्रसाद बागवे म्हणाले, की सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून आम्ही व्यावसाय सुरू करण्यास तयार आहोत, मुंबई, पुणे शहरी भागात सर्वाधिक रुग्णसंख्या असताना तेथील सर्व उद्योग, व्यावसाय सुरू आहेत. ग्रामीण भागातील व्यावसायिकांवर अन्याय नको. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा बागवे यांनी दिला. 

भाऊसाहेब हुलावळे म्हणाले, की नागरिक आर्थिक संकटात असताना फायनांस कंपन्यांकडून हप्त्यांसाठी तगादा लावला जात आहे, सर्व बंद असतानाही वीज वितरण कंपनीच्या वतीने भरमसाठ वीजबिले आली आहेत. ही बंदी राहिल्यास ग्रामीण भागातील व्यावसायकांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. 

लॉकडाउनमुळे सर्व ठप्प आहे, लहान मोठे व्यावसायिक अद्यापही मदतीच्या अपेक्षेत आहेत, ग्रामीण व्यवसाय संघटना आणि व्यावसायिकांकडून स्वतःच्या व पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत असेल, तर सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक प्रताप डिंमळे यांनी केली.

loading image
go to top