esakal | ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पिंपरी-चिंचवडमध्ये काळा बाजार 
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir_bottle

शहरात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पिंपरी-चिंचवडमध्ये काळा बाजार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील ऑक्सिजन पुरवठादार हे साठा असूनही तुटवडा असल्याचे सांगताहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचाही काळाबाजार सुरू आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या युद्धपातळीवर नियोजन करून वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीत महापालिका प्रशासन आणि कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन कमी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुग्ण खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. तिथे गंभीर अवस्थेतील सामान्य रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. ऑक्सिजन बेड व आयसीयू बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांची धावपळ होत आहे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परिस्थिती चिंताजनक बनली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असून, आपले सूचना-आदेश न जुमानणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करावी. रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडल्याने काळाबाजार सुरू झाल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन पुरवठादार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन तत्काळ योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.

loading image